Monday, August 24, 2026

मन

 मन असावे सदा निर्मळ  !!  जसे वाहते नदीचे संथ जळ !!

       स्वच्छ,प्रेमळ, निस्वार्थी अंतरी !!

  घ्यावा गुण नदीचा तरी !!

       फिरुनी येते मन क्षणात नभांतरी !!

   भटकु न द्यावे त्यास,कुकर्मांवरी !!

   सत्कर्म करुनी अर्पावे 

    गुरू चरणावरी !!

      फळ देतो तो आपणास सत्वरी!!

      संगतीत असावे सदा सज्जनांच्या!!

      वारा न लागू द्यावा 

            दुर्जनांचा!!

 कर्म करीता मनी वास असावा हरीचा !!

 गंध नसावा कधी षडरिपूंचा !!

         स्वच्छंदी वावरावे 

पक्षांप्रमाणे !!

परी स्थिर व्हावे गुरू कृपेने !!

       मन असते वढाळ वढाळ !!

     होतो त्यानी  जिवनाचा घोळ !!

  लगाम लावता वेळोवेळ !!

   पसरविता गुरू सेवेशी ओंजळ  !!

   राहूनी संतांच्या वचनांशी जागृत!

   होई संकटांवरी मात !!

   प्रपंच करुनी परमार्थ साधावा !!

   सहवास सदा गुरू चरणाचा असावा !!

     क्षमा मागते मी लहरी चरणी !!

    सतत नाम तुझे यावे माझ्या मनी !!

    हा जीव तुला टाकते ओवाळूनी !!

    आठवू दे नाम तुझे शेवटच्या क्षणी  !!

     आपलीच कृपांकित भक्त........ 


-ज्योती महल्ले, अमरावती 

No comments:

Post a Comment