Monday, August 24, 2026

मन

 मन असावे सदा निर्मळ  !!  जसे वाहते नदीचे संथ जळ !!

       स्वच्छ,प्रेमळ, निस्वार्थी अंतरी !!

  घ्यावा गुण नदीचा तरी !!

       फिरुनी येते मन क्षणात नभांतरी !!

   भटकु न द्यावे त्यास,कुकर्मांवरी !!

   सत्कर्म करुनी अर्पावे 

    गुरू चरणावरी !!

      फळ देतो तो आपणास सत्वरी!!

      संगतीत असावे सदा सज्जनांच्या!!

      वारा न लागू द्यावा 

            दुर्जनांचा!!

 कर्म करीता मनी वास असावा हरीचा !!

 गंध नसावा कधी षडरिपूंचा !!

         स्वच्छंदी वावरावे 

पक्षांप्रमाणे !!

परी स्थिर व्हावे गुरू कृपेने !!

       मन असते वढाळ वढाळ !!

     होतो त्यानी  जिवनाचा घोळ !!

  लगाम लावता वेळोवेळ !!

   पसरविता गुरू सेवेशी ओंजळ  !!

   राहूनी संतांच्या वचनांशी जागृत!

   होई संकटांवरी मात !!

   प्रपंच करुनी परमार्थ साधावा !!

   सहवास सदा गुरू चरणाचा असावा !!

     क्षमा मागते मी लहरी चरणी !!

    सतत नाम तुझे यावे माझ्या मनी !!

    हा जीव तुला टाकते ओवाळूनी !!

    आठवू दे नाम तुझे शेवटच्या क्षणी  !!

     आपलीच कृपांकित भक्त........ 


-ज्योती महल्ले, अमरावती 

क्षण

 एक क्षण पुरेसा असतो,

परिस्थिती बदलायला;

नशिबाच्या खेळात कधी,

सारे काही जुळून यायला...


एक क्षण महत्त्वाचा असतो,

स्वतःची परीक्षा घ्यायला;

आयुष्य पुन्हा पुन्हा देत नाही,

संधी तीच—वन्स मोअर मागायला!


म्हणून निर्णय घ्या विचारपूर्वक,

संधीला हातातून निसटू देऊ नका;

तयार राहा सदैव तत्पर,

क्षणाक्षणाचे मोल जाणून घ्या.


कारण प्रत्येक क्षण महत्त्वाचा...!


'मी'पणाचा अतिरेक घातक,

अहंकार नेहमीच विनाशकारी;

वेळेनुसार बदलता आले,

तरच वाट होते यशाची सारी.


परिस्थितीचे भान ज्याला,

तोच खरा बाजी मारतो;

कधी ताठ उभा राहतो,

कधी योग्य वेळी झुकतो.


अहंकार बुडवितो भल्याभल्यांना,

हे सत्य विसरू नका कधी;

वेळेसोबत बदलताना,

मनात ठेवू नका खंत कधी.


भरवसा नाही या आयुष्याचा,

उद्या असेलच याची खात्री नाही;

म्हणून आजचा क्षण जगा,

याहून मोठी संधी नाही.


कारण प्रत्येक क्षण महत्त्वाचा...!


“कल करे सो आज कर,

आज करे सो अब...”

उद्याची वाट पाहत बसू नका,

वर्तमानच आहे जीवनाचा खरा ठाव.


भविष्याच्या गर्भात काय दडले,

हे कुणालाच ठाऊक नसते;

म्हणून जे चांगले करता येईल आज,

ते उद्यावर कधीही सोडू नये.


प्रत्येक क्षणात एक संधी आहे,

प्रत्येक श्वासात नवी पहाट;

सत्कर्मांची साथ सोबत ठेवा,

हीच जीवनाची खरी वाट.


वेळ निघून गेल्यावर

क्षण फक्त आठवणीत उरतो;

म्हणून मिळालेल्या प्रत्येक क्षणाला

अर्थपूर्ण करून जगा...


कारण—

आयुष्य मोठे असण्यापेक्षा,

प्रत्येक क्षण मोठा असणे महत्त्वाचे...!


— ज्योती महल्ले, अमरावती 

Friday, March 16, 2012

जिंदगी हो तुम!!

A very very meaningful lines -
राह के साथ चलती  इन नदीयो  को  देखो , इन झर्नो  को  देखो,
जिस  तरह समय  किसके  लिये रूकता नही
समय के साथ चलता इंका  पाणी देखो,
समय के साथ बेहेता इंका पाणी भी किसीके लिये रूकता नही ,
अगर तुम भी इनके तरह बेहाना सिख लो तो जिंदगी हो तुम!!